‘ते आणि आम्ही’ ही विचारधारा आक्रमकपणे ठसवणाऱ्या काळात हे पुस्तक सामाजिक सौहार्द प्रस्थापित करू पाहणाऱ्यांना बळ देते!
फाळणी पश्चात गेल्या दोन दशकांपासून इथल्या सर्वसामान्य हिंदू बांधवांचे जमातवादी मुस्लीम द्वेषाचे राजकारण (हेट पॉलिटिक्स), झुंडशाही व मॉब लिंचिंगच्या रूपाने समोर येत आहे. सातत्याने इतिहासाची खोटी व भ्रामक मांडणी करून मुसलमानांच्या शत्रूकरणावर आधारित हिंदू राष्ट्र निर्मितीचा अजेंडा घटनेने मान्य केलेल्या धर्मनिरपेक्ष देशात अंमलात आणण्याच्या कालावधीत हे पुस्तक नव्या स्वरूपात समोर येत आहे.......